सतीश काळसेकर यांना कवितेतून अभिवादन : प्रगतिशील लेखक संघ व इप्टा आयोजित ‘काव्यसंध्या’

प्रमोद अहिरे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २

प्रगतिशील लेखक संघ महाराष्ट्र आणि इप्टा महाराष्ट्र आयोजित कवी सतीश काळसेकर यांना अभिवादन करण्यासाठी ‘काव्यसंध्या’ हा ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला. कवयित्री नीरजा यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन संपन्न झाले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या की ‘काळसेकर यांच्या जाण्याने नव्या पिढीतल्या होतकरू कवी, लेखक यांचे मोठे नुकसान झाले आहे. जगणं उलगडत जाणारी पात्रे काळसेकर यांच्या कवितेत आहेत. आता सादर केलेल्या कविता या काळाला भिडणाऱ्या, तसेच मानवी जीवनाविषयी सखोल विचार मांडणाऱ्या आहेत.’

सतीश काळसेकरांच्या कविता आणि कवीची स्वतःची कविता असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. ह्या कविसंमेलनात प्रवीण दशरथ बांदेकर ( सावंतवाडी ), पी. विठ्ठल ( नांदेड ), रफीक सुरज ( कोल्हापूर ), कल्पना दुधाळ ( पुणे ), वर्जेश सोळंकी ( वसई।), रवी कोरडे ( औरंगाबाद ), सत्यपाल सिंग राजपूत ( जळगाव ), शर्मिष्ठा भोसले ( मुंबई।), आनंद विंगकर ( सांगली ), सुदाम राठोड ( नाशिक ), प्रसेनजीत तेलंग ( अमरावती ), प्रमोद अहिरे ( नाशिक ) या कवींनी सामाजिक विषयावरील कविता सादर केल्या. समाधान इंगळे (औरंगाबाद ) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!