इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ – इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे आज सकाळी एका अज्ञात युवकाचे प्रेत आढळून आले आहे. झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह पाहिल्यानंतर स्थानिकांनी घोटी पोलिसांना माहिती दिली. ह्या युवकाबाबत कोणाला काही माहिती अथवा कुटुंबाबाबत माहिती असेल तर ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ह्या अज्ञात युवकाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष असून रंग काळा सावळा आहे. टक्कल केलेले असून उंची साधारण ५ फूट ५ इंच, अंगात चॅम्पियन नाव लिहिलेला निळ्या रंगाचा टी शर्ट, लाल रंगाची हाफ पॅन्ट आहे. मयत युवकाला कोणी ओळखत असेल तर घोटी पोलीस स्टेशन, मारुती बोराडे 8805007608 अथवा जवळच्या पोलीस ठाण्याशी यांच्याशी संपर्क करावा असे कळवण्यात आले आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group