वाडीवऱ्हे ते शेणवड खुर्दची मुख्य वीज वाहिनी बदलावी : तुकाराम वारघडे ; आमदार हिरामण खोसकर यांना दिले मागणीचे निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

महावितरणच्या शेणवड खुर्द उपकेंद्रावर शेणवड खुर्द, गरूडेश्वर, पाडळी देशमुख, मुंढेगाव, नांदगाव बुद्रुकच्या आदिवासी 12 वाड्या अशा 25 गांवांचा लोड आहे. मात्र शेणवड खुर्द उपकेंद्राला जोडणारी मुख्य वीज वाहिनी अतिशय जुनी झाली आहे. त्यामुळे सतत विजेचे खांब पडणे, चिमण्या जळणे असे प्रकार होतात. परिणामी अनेक कारणांमुळे सतत वीज पुरवठा खंडीत होत असतो. यामुळे ह्या भागातील नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. ह्या पार्श्वभूमीवर वाडीवऱ्हे महावितरण कार्यालय ते शेणवड खुर्द उपकेंद्रापर्यंतची मुख्य वीज पुरवठा करणारी वाहिनी बदलावी अशी मागणी घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुकाराम वारघडे यांनी केली आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांना त्यांनी याबाबत निवेदन दिले. या मागण्यांबाबत महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी पावले उचलू अशी ग्वाही आमदार खोसकर यांनी दिली.

पावसाळा असल्याने आपातकालीन परिस्थितीत सतत वीज पुरवठा खंडीत होत असतो. शेणवड खुर्द महावितरण उपकेंद्राला जोडणारी मुख्य लाईन सतत खराब होत असल्याने एक-एक दोन दिवस वीज पुरवठा खंडीत होत असतो. भात शेतीचा हंगाम असुन भात शेतीसाठी विजेमुळे पाण्याची अडचण शेतकऱ्यांना निर्माण होत असते. पाडळी-जानोरी रेल्वे लाईनच्या परीसरात बिबट्या दिसण्याच्या  तक्रारी आहेत. अंधारामुळे नागरिक संकटात सापडतात. म्हणून आमदार हिरामण खोसकर यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली असल्याचे तुकाराम वारघडे म्हणाले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!