मेटकावर – हेदपाडा रस्त्यावर दरड कोसळली ; दुतर्फा चाऱ्या नसल्याने मैला रस्त्यावर

सुनील बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोंबिलटेक मेटकावरा- हेदपाडा रस्तावर अतिपावसामुळे माती थेट रस्त्यावर वाहून आल्याने अडचण निर्माण झाली आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत  झालेल्या रस्त्याची पाच वर्षे दुरुस्ती व देखभाल करण्याची जबादारी संबंधित ठेकेदार व प्रशासनाची असताना कुठल्याही प्रकारची दुरुस्ती झाली नाही. गावकऱ्यांनी रस्त्याच्या कडेच्या चाऱ्या काढण्याची मागणी करूनही संबंधित ठेकेदार व प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे.

ऐन पावसाळ्यात डोंगराची माती- दगड थेट रस्त्यावर येऊन रस्त्याचे मोठी नुकसान झाले. याबाबत समजताच तहसीलदार दीपक गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली  महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत सर्व अधिकारी यांना सदर घटनेची माहिती देण्यात आली. तहसिलदार गिरासे यांनी उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांना घटनेविषयी माहिती देण्यात आली व  दरड हटवण्यास सुचना केल्या. प्रांताधिकारी तेजस चव्हाण  घटनास्थळी पोहोचले.

उशिरा पर्यंत जेसीबी, ट्रॅक्टर तसेच ग्रामस्थांच्या मदतीने दरड हटवण्यात आली. घटनास्थळी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दिपक गिरासे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे फडांगळे, मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी, तलाठी पल्लवी जाधव, संजय पाटील, ग्रामसेवक सचिन पवार, सुनील मेढे दिनकर कावरे, ग्रामपंचायत कर्मचारी यासह इतर तलाठी महसूल विभागाचे कर्मचारी गावकरी उपस्थित होते.

■ अतिदुर्गम भागातील घटना स्थळाची माहिती बचाव पथकांना मिळवण्यासाठी  दिशादर्शक नकाशा व पर्यायी रस्ताची माहिती नियंत्रण कक्षात तात्काळ उपलब्ध करून देणे आवश्यक.
■ शोध व बचाव पथक यांच्यासाठी टॉर्च, रोप, फावडे व इतर साहित्य पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे
■ रात्रीच्या वेळेस घटना घडली तर Immergancy Light आवश्यक. तसेच रात्रीच्या वेळी मदत कार्य करण्यासाठी छोटे पोर्टेबल जनरेटर सेट असणे आवश्यक आहे.
■ प्रत्येक गावात आपत्ती विषयी जनजागृती आवश्यक. संभाव्य आपत्ती होऊ शकणाऱ्या बाबींची माहिती नागरिकांकडून अगोदर मिळणेसाठी प्रशिक्षण व प्रयत्न आवश्यक

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!