लेखन : सुनील बोडके पाटील, पत्रकार
जनमानसांचा जागृत नेता, प्रेमळ, सोज्वळ व्यक्तिमत्व, सदैव गोरगरीब, कष्टकरी, वंचितांच्या भविष्याचा विचार करणारे तांबड्या मातीतील खरे – खुरे अस्सल बावनकशी सोने म्हणजे समाधान बोडके पाटील. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात आपल्या कामाच्या जोरावर गरीब जनतेच्या तोंडात येणारे पहिले नाव म्हणजे समाधान. आपल्या नावाप्रमाणे नेहमी समाधानी असणाऱ्या या जादूगाराला पाहिल्यावर मग माणूस कोणत्याही प्रकारच्या दुःखात असो त्याच्यावर चेहऱ्यावर हसू अन मुखात समाधान हे नाव आल्याशिवाय राहत नाही. बेड वर पडलेल्या व्यक्तीला समाधान अण्णाला पाहिल्यावर लढायचे बळ येते. माझा हा आजार काहीच नाही, मला काही होणार नाही कारण येथे समाधान आला आहे. तो मला काही होऊ देणार नाही याची शाश्वती बेडवर पडलेल्या त्या माणसाला असते. ही भावना जनमाणसांच्या मनात अण्णा तुम्ही निर्माण केलीत. हीच तुमच्या कामाची पावती आहे.
कोणत्याही क्षेत्रात सर्वसामान्य जनतेला येत असलेल्या रोजच्या जीवनातील अडचणी मग त्या कितीही कठीण असो त्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी समाधान एकमेव नावाचा उच्चार होत असतो. संकटसमयी तुम्ही मित्र शत्रू भेद करत नाही. तुम्ही मित्राला मदत करतात त्याच उमेदीने शत्रूलाही मोकळ्या हाताने मदत करत असतात. कधीकधी तुमच्या ह्याच वृतीचा हेवा वाटतो. कुणाचे दवाखान्याच्या अडचणी, गोरगरीबांचे लग्न असो तुम्ही तिथं हजर असतात. हे आपल्याच घरातील सदस्य आहेत याच जबाबदारीने व निःस्वार्थ पणे जनतेच्या अडचणी सोडवत असतात. गरिबांची सेवा करण्याची शक्तीच जणु ईश्वराने या तुम्हाला दिलेली आहे. जनतेची सेवा करतांना तुम्ही कुठलाही वेळकाढूपणा करत नाही. स्वतःचे कितीही महत्वाचे काम असो ते बाजुला ठेऊन पहिले गरीबांच्या कामांना महत्व देत कामे मार्गी लावतात.
राजकारण हे फक्त खुर्च्या गरम करण्यासाठी नसून लोकांची तितक्याच संवेदनांना जाणून सेवा करावी लागते. समाजकारणात आपला बहुमूल्य वेळ खर्ची करत असताना तुमचे कार्य पाहिले तर राजकारण कमी परंतु समाजकारण करून तुम्ही लोकांच्या गळ्यातील ताईत बनलात. बोडके पाटील यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन अनेक तरुण व्यवसाय , शिक्षण, रोजगार यामध्ये पुढे जात आहेत. आपले अस्तित्व निर्माण करत आहेत. कोणीही समाधानचे नाव सांगितले तर मग कुठल्याही ऑफिसला माणूस गेला तर त्याचे काम होणारच याची खात्री त्या माणसाला असते. प्रशासनातील आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांबरोबर असलेले स्नेहाचे सबंध अन काम करून घ्यावयाची हातोटी याला तालुक्यात तोड नाही.
तालुक्याच्या सर्वांगीण विकासात बोडके पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. शेतकऱ्यांना धरणातून पाणी परवानगी दिल्या. वाढीव पोल ट्रान्स्फॉर्मर बसवून दिले. तत्कालीन खासदार कै चिंतामण वणगा व आमदार पांडुरंग गांगड यांच्या माध्यमातून वळण योजना धरण मंजूर करून बांधल्याने गोरगरीब शेतकरी बांधवांना पाणी मिळाले. गरजू व कष्टकरी लोकांच्या हाताला काम दिले. सामाजिक जीवनात काम करत असताना तरुणांमध्ये नवसंजीवनी, ऊर्जा, प्रेरणा, बळ यांचे शिक्षण सर्वांना नेहमीच मिळत असते. त्र्यंबकेश्वर तालुक्याचे हरहुन्नरी नेतृत्व बावनकशी सोने समाधान बोडके पाटील यांना यानिमित्ताने वाढदिवसाच्या सस्नेह शुभेच्छा…!