
कवी – जी. पी. खैरनार, नाशिक, ९४२१५११७३७/ ७०८३२३४०२१
जन माणसात शोधू,
लोकसेवेचा वारसा !
मतदार राजा आहे,
लोकशाहीचा आरसा !!
मतदान करण्याचा,
हक्क आहे लहानसा !
नेता निवडणे तुझ्या,
हातात आहे राजसा !!
पैशाला बळी पडून,
नको भरु रिता खिसा !
खात्री करुन मत दे,
थांबव देशाच्या ऱ्हासा !!
हळूच म्हणती नेते,
काय लागतो कानोसा !
पैशापुढे माणसाचा,
काहीच नाही भरोसा !!
भ्रष्टाचारा आळा घालू,
थांबवु खोटी लालसा !
भलं होण्या भारताचं,
जपु लोकशाही वसा !!
शत्रु राष्ट्र भारताला,
देतील म्हणे हादसा !
सैनिकांच्या ताकदीने,
करु त्यांचा खालसा !!
लोक म्हणती प्रेमाने,
भारत देश हो कसा !
बहु जाती भाषी राष्ट्र,
भारत देश हो असा !!
भारत मातेचं माझ्या,
ब्रीद असती अहिंसा !
सुखी ठेवण्या लोकांना,
टाळूया जगाशी हिंसा !!
मातृ भूमी रक्षणाशी,
निष्ठा ठेव रे माणसा !
मताचे पैशात मोल,
थांबव आता राक्षसा !!
भारताच्या परंपरा,
जपु संस्कृती वारसा !
नितळ लोकशाहीचा,
आदर्श देऊ छानसा !!