वाडीवऱ्हे येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय व प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे ( महाराष्ट्र व गोवा राज्य ) तथा क्षेत्रीय प्रचार कार्यालय अहमदनगर यांच्या वतीने स्वतंत्र भारताचे गौरवशाली अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने कार्यक्रम सुरू आहेत. त्यानुसार आनंदतरंग फाउंडेशनचे शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी या कलासंचाचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम औद्योगिक परिक्षेत्रातील वाडीवऱ्हे येथे संपन्न झाला.

यावेळी कारगील योद्धा नायक दिपचंद यांनी कलावंतांबरोबर देशभक्ती म्हणजे काय ?  देशाप्रती आलेली दृढ भाव-भक्ती याविषयी विचार मंदिन त्यानंतर देशभक्तीपर गीत गायले. यावेळी मेजर विजय कातोरे यांनी विविध क्षेत्रातील यश संपादन केलेल्या अनेकांचा सन्मान केला. क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे, भुमीपुत्र फाउंडेशनचे विनोद नाठे, सरपंच रोहिदास कातोरे, उपसरपंच प्रवीण मालुंजकर, माजी सैनिक रवींद्र शार्दुल, हरिष चौबे, फोकणे, साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, के. टी. राजोळे, डॉ. प्रशांत मुतडक, डॉ. योगेश मते, दिलीप मालुंजकर, हिरामण कातोरे, अशोक मोरे, तानाजी राजोळे, आत्माराम मते, राम शिंदे, शरद मालुंजकर, किरण कातोरे आदी बहुसंख्येने उपस्थित होते. आनंदतरंग कलापथाकाचे शाहीर उत्तम गायकर यांना शाल, श्रीफळ, बुके, रोख रुपये २१०० व इगतपुरी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

या कार्यक्रमात शाहीर उत्तम गायकर यांच्यासह शंकरराव दाभाडे, देविदास साळवे, शिवाजी गायकर, नामदेव गणाचार्य, दुर्गेश गायकर, प्रशांत भिसे, पंढरीनाथ भिसे, रामकृष्ण मांडे, रत्नप्रभा मराडे, सागर भोर, इगतपुरी तालुका स्वयंसेवक ओमकार गायकर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन योगेश कटारिया तर शाहीर उत्तम गायकर व आनंदतरंग कलासंचाचे कलावंतांकडून ग्रामपंचायत वाडीवऱ्हे व मेजर विजय कातोरे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊन आभार मानले.