सातवा वेतन आयोग फरकाचा हप्ता त्वरित मिळावा – रामराव काळे : शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षक भारतीचे निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

अहमदनगर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग दुसरा हप्ता शासन आदेशाप्रमाणे जमा करावा या मागणीसाठी अहमदनगर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी व वेतन अधीक्षक यांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती संघटनेकडून ई-मेल द्वारे निवेदन देण्यात आले. घड्याळी तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे वेतन, वैद्यकीय बिल, थकबाकी बिले त्वरित मंजूर करावे अन्यथा शिक्षक भारती आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे असे प्रतिपादन कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष रामराव काळे, सरचिटणीस महेश पाडेकर यांनी केले.

वेतन पथक माध्यमिक यांच्याकडून निधी नाही असे वारंवार उत्तर दिले जाते. निधी उपलब्ध करणे, निधीची मागणी करणे योग्य वेळी न झाल्यामुळेच शिक्षकांना वेतनापासून वंचित रहावे लागते अशी कुजबुज जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे वेतन पथकाकडून सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता त्वरित मिळावा, राष्ट्रीय निवृत्ती योजनेचा हिशोब त्वरित द्यावा, एनपीएस प्राण किट द्यावी अशा विविध मागण्या प्रलंबित आहे. त्या पूर्ण करण्यासाठी शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, कार्याध्यक्ष डॉ. किशोर डोंगरे, सल्लागार कैलास राहणे, प्रसिद्धीप्रमुख अमोल चंदनशिवे, जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु,उपाध्यक्ष सचिन जासूद, माफीज इनामदार, सचिन लगड, संजय तमनर, अमोल वर्पे, महिला राज्याध्यक्ष रूपाली कुरुमकर, रूपाली बोरुडे, श्याम जगताप, प्रवीण मते, दादासाहेब कदम, संतोष निमसे, गोवर्धन रोडे, संजय पवार, विजय कराळे, जिल्हाध्यक्ष मोहम्मद शमी शेख, संभाजी पवार, संपत वाळके, संजय भालेराव, हर्षल खंडीझोड आदी पदाधिकारी यांनी मागणी केली आहे

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!