कुरुंगवाडी येथे शिवसेना शाखा ही माझ्या कामाची पावती : निर्मला गावित ; कुरुंगवाडी व जामुंडे येथे शिवसेना शाखेचे उदघाटन

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या कुरुंगवाडीत दहा वर्षांपूर्वी येण्यासाठी रस्ता, वीज आदी समस्यां मोठ्या प्रमाणात होत्या. मात्र मी आमदार असताना या गावातील सर्व समस्या मार्गी लावल्या असून यासाठी गावातील ग्रामस्थ तथा माजी सरपंच शंकर सावंत यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून गावात शिवसेना शाखेचे उदघाटन केले असून हीच माझ्या कामांची पावती असल्याचे मनोगत माजी आमदार निर्मला गावित यांनी व्यक्त केले. जामुंडे व कुरुंगवाडी येथे शिवसेना शाखा उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, रघुनाथ तोकडे, विठल लंगडे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार निर्मला गावित, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी, रमेश गावित, पंचायत समिती सदस्य कावजी ठाकरे, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, रघुनाथ तोकडे, नंदलाल भागडे, तात्यापाटील भागडे, कमळु गावंडा, सुर्यकांत भागडे, व्यंकटेश भागडे, मच्छीन्द्र भगत, जनार्दन लंगडे, देवराम म्हसणे, लहानु सावंत, देविदास लंगडे, धोंडीराम भागडे, रंजना सावंत, माजी सरपंच शंकर सावंत, पिंटु गोईकणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवराम म्हसणे यांनी केले तर आभार नंदलाल भागडे यांनी मानले. यावेळी कुरुंगवाडी व जामुंडे येथे शाखा प्रमुख नेमिनाथ डोके, हिरामण डोके, ज्ञानेश्वर डोके, संतु डोके, लहानु डोके, श्रावण डोके आदींनी शिवसेना शाखा उदघाटनासाठी परिश्रम घेतले.