३७ वर्ष शिक्षण क्षेत्रात अथक सेवा देणारे केंद्रप्रमुख श्रीराम आहेर यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

दीपक भदाणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात आपल्या कामातून लोकसेवा करणारे केंद्रप्रमुख श्रीराम आहेर यांची सेवानिवृत्ती नव्या लोकोपयोगी कार्याचा प्रारंभ आहे. आजचा सोहळा आपल्या कार्याची ओळख करून देणारा असून डोळ्याची पारणे फेडणारा आहे. त्यांना वाढदिवस आणि सेवानिवृत्ती नंतरच्या चांगल्या आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आपले चेहऱ्यावरील हास्य सदोदित राहो प्रतिपादन इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी केले. एकलव्य आदिवासी पब्लिक स्कूल भावली येथे नांदगाव सदोचे केंद्रप्रमुख श्रीराम आहेर यांच्या सेवापूर्ती समारंभानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी विस्ताराधिकारी अशोक मुंढे, राजेंद्र नेरे, केंद्रप्रमुख राजेंद्र डुकले, शिक्षक नेते निवृत्ती नाठे,शिक्षक, उमेश बैरागी, मंजुषा आहिरे, कापडणीस मॅडम, ज्ञानेश्वर भोईर, निवृत्ती तळपाडे, भाऊराव बांगर, प्रकाश सोनवणे, हरिश्चंद्र दाभाडे, सचिन कापडणीस, सुनिल सांगळे, संतोष श्रीवंत, आप्पा जाधव, अतुल आहिरे, वैभव गगे, सौरभ आहिरराव, प्रशांत देवरे, विशाल सोनवणे, केंद्र मुख्याध्यापक संजय खैरनार, भगवान भामरे, भारती आहिरे, केंद्रप्रमुख यांच्या पत्नी सरला बच्छाव आहेर, मुलगा अक्षय आहेर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

पत्नी सरला बच्छाव आहेर यांनी अतिशय कठीण काळात पती आहेर साहेबांनी कठीण परिश्रम घेतले. सर्व कुटुंबाला पुढे आणले असल्याचे सांगत कठीण परिश्रम, योग्य नियोजन, राग न येणे हे त्यांची महत्त्वाची गुणवैशिष्ठ्य असल्याचे सांगितले. असे कुटुंबप्रमुख घराघरात असल्यास दर्जेदार कुटुंब तयार होतील असे सांगितले. वडिलांच्या अनेक गुणवैशिष्ट्यांचा परिणाम माझ्यावर झाला आहे. माझे वडील माझ्यासाठी सर्वात प्रिय असल्याचे सांगत त्यांची संस्काराची शिदोरी मला आयुष्यभर प्रेरणादायी राहील असे मुलगी प्रज्ञा जाधव म्हणाली. यावेळी श्रीराम आहेर यांनी सर्वांची कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन अनिल शिरसाठ, प्रास्ताविक सुनील सांगळे तर आभार अतुल अहिरे यांनी मानले.

श्रीराम आहेर यांच्या स्वभावावर आधारित काढण्यात आलेली रांगोळी

Similar Posts

error: Content is protected !!