त्र्यंबकेश्वर तालुक्यात शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला प्रारंभ

सुनील बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर तालुक्यात शिवसंपर्क अभियानाला सुरवात झाली आहे. पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील वाढोली, पहिने, वेळुंजे, हरसूल, मूलवड आदी गावांना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यामध्ये कोविड काळात जिवाची बाजी लावून रुग्ण सेवा करणाऱ्या गावातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, शिवसेना शाखा प्रमुख यांचा सन्मान व्हावा तसेच त्यांची विचारपूस करावी यासाठी शिवसेना शिवसंपर्क अभियान असल्याचे पदाधिकारी म्हणाले.

शिवसेना जिल्हाप्रमुख  विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार निर्मला गावीत, काशीनाथ मेंगाळ,शिवसेना नेते समाधान बोडके पाटील, निवृत्ती लांबे, मनोहर मेढे, रमेश गावीत, तालुकाप्रमुख संपत चव्हाण, रवी वारुंगसे, मनोहर महाले, संजय मेढे पाटील, शिवाजी कसबे, रामनाथ बोडके, भावडू बोडके, अशोक उघडे, प्रदीप तिदमे, रावसाहेब कोठुळे, तानाजी कड, रंगनाथ मिंदे, देविदास जाधव, आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार निर्मला गावित यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना त्यांनी कोविडच्या काळात शिवसैनिक व आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांनी चांगले काम केले आहे. सर्वांनी लस घेण्यासाठी लोकांची जनजागृती करावी असे आवाहन केले. यावेळी त्यांच्या हस्ते महिला कर्मचारी यांना पैठणी भेट देऊन आशा कर्मचारी यांचे मनोबल वाढवण्याचा पर्यंत करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख यांचा सांगावा घेऊन आलोय की, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तळागाळातील शिवसैनिकापर्यंत पोहचा. शिवसैनिक व शिवसेना यांच्यात कुठलीही पोकळी निर्माण होऊ नये यासाठी हे अभियान असल्याचे सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!