कवितांचा मळा : पंढरीचा राजा

रचना : सौ. माधुरी पाटील शेवाळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडाळे
ता. इगतपुरी, जि. नाशिक
संवाद : 7588493260

पंढरीचा राजा । उभा विटेवरी
नाम जप करी । भक्तगण ।। १ ।।

विठ्ठल -विठ्ठल । दिसता मंदिरी
जोडीलाच भारी । रखुमाई ।। २ ।।

निघतसे दिंडी । पंढरीची वाट
चढे दिवे घाट । वारकरी ।। ३ ।।

गजर कीर्तनी । मृदुंग वाजती
फुगडी खेळती । रिंगणात ।। ४ ।।

मुखी गोड नाम । भजन गाऊनी
तल्लीन होऊनी । नाचतीया ।। ५ ।।

पालखी निघाली । चंद्रभागे तिरी
सारे वारकरी । स्नान करी ।। ६ ।।

कपाळी टिळा । पांडुरंग हरी
सावळा मुरारी । विष्णुदेव ।। ७ ।।

विठू राया उभ्या । जगाची माऊली
सर्वांची सावली । पांडुरंगा ।। ८ ।।

पंढरी नगरी । तृप्त झाले मन
घेतले दर्शन । कळसाचे ।। ९ ।।

धन्य झाले आज । विठू नगरीत
पुण्य मिळे मज । चारीधाम ।। १० ।।

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!