विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांना इगतपुरी तालुका प्रहार संघटनेकडून साकडे

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६

इगतपुरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या असून त्या सोडवण्यासाठी पावले उचलावीत. तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी पाणी परवानगी मिळावी आदी मागण्यांचे निवेदन प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन पाटील गव्हाणे, उपाध्यक्ष सोपान परदेशी यांनी राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांना भेटून दिले.

निवेदनात नमूद मागण्या अशा आहेत. दिव्यांग बांधवांना सर्व क्षेत्रात राजकीय आरक्षण द्यावे, तालुक्यातील शासकीय कार्यालय, तहसील, पंचायत समिती कारभारात पारदर्शकता यावी, दिव्यांग बांधवांना उपयुक्त दिव्यांग साहित्य पुरवठा करावा, स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार निधीतून दिव्यांग निधी खर्च करण्याची सक्ती करावी, घोटी ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी शासनाकडून मान्यता द्यावी, दिव्यांग शेतकरी बांधवांना वाकी खापरी दारणा नदी लगत शेतकरी बांधवांना पाणी परवानगी उपलब्ध करून द्यावी
ना. बच्चू कडू यांनी ह्या मागण्यांबाबत संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून प्रश्न मार्गी लावू असे सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!