शिवसंपर्क अभियान : नाशिकला शिवसेनेचा बालेकिल्ला करण्यासाठी कटिबद्ध – भाऊसाहेब चौधरी

शिरसाठे गटात अभियानाला जोरात प्रतिसाद

किरण रायकर, इगतपुरीनामा न्यूज, दि. १७

जिल्ह्यात शिवसेनेला वैभव मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून आगामी काळात नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असेल असा विश्वास उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी  यांनी व्यक्त केला. शिरसाठे गटातून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला गुरुवारी सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार निर्मला गावित, काशीनाथ मेंगाळ, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, उपतालुकाप्रमुख रमेश धांडे, जिल्हा परिषद सदस्य नयना गावित, तालुकाप्रमुख भगवान आडोळे आदी उपस्थित होते.

शिवसेनेची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचविणे, शासनाच्या प्रत्येक योजनांची माहिती त्या- त्या लाभार्थ्यांपर्यंत पोचविणे शिवसेनेचे कार्यकर्ते – पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये समन्वय वाढवून शिवसेनेला बळकटी मिळवून देण्याच्या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

शिरसाठे गटातून सुरुवात करण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानाला जोरदार प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, जिल्हाप्रमुख विजय करंजकर  यांच्यासह अनेक जणांची उपस्थिती होती. भाऊसाहेब चौधरी  म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात शिवसेनेला जे वैभव होते, जी ताकत होती की ताकत आणि ते वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. शिवसेनेची गाव तिथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक हा संकल्प असून तो पूर्ण केला जाईल. याअनुषंगाने शिवसंपर्क अभियान अधिक गतिमान करण्यात येणार आहे.

यावेळी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ म्हणाले की, शिवसेनेने आणि शिवसैनिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो विश्वास सार्थ ठरवत जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी विधानसभा  मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन असा विश्वास मेंगाळ यांनी दिला. जिल्हाप्रमुख विजय करंजकर  म्हणाले की, तळागळातील आणि सामान्य नागरिकांच्या पाठीशी सदैव शिवसेना उभी राहिली आहे. शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार यांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरुन शिवसेनेने अनेक आंदोलने केली आहेत. कोरोना काळातही शिवसेनेने आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. महाराष्ट्राची वाटचाल शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दमदार सुरु आहे. आगामी काळातही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या तत्वाने काम करुन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी आणि शिवसेनेला भक्कम करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असा संकल्प यावेळी जिल्हाप्रमुख  यांनी व्यक्त केला.

यावेळी इगतपुरी पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी, गटनेते विठ्ठल लंगडे, गणप्रमुख रामचंद्र गायकर, उपतालुकाप्रमुख रमेश धांडे, चेअरमन शिवाजी शिरसाठ, सरपंच गोपाळ पाटील, निवृत्ती शिरसाठ, राजाराम पाटील, दिगंबर शिरसाठ, लालू शिरसाठ, माजी सरपंच नंदू पाडेकर, लक्ष्मण रायकर, दिगंबर पाटील, गणेश पाटील, त्र्यंबक बाबा, नंदू शेलार आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!