ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये जिल्हाध्यक्ष पवन पवार यांनी त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्षपदी उमेश सोनवणे यांची निवड केली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून सोनवणे कार्यरत आहेत. सामाजिक कार्य करुन गोरगरिब, वंचित, शोषित यांचे प्रश्न सोडविणारे पत्रकार उमेश सोनवणे यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष पवन पवार यांनी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्षपदी उमेश सोनवणे यांच्या निवड करण्याचा निर्णय जिल्हा कार्यकरिणीत सर्वानुमते घेण्यात आला. नाशिक जिल्हा संपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष पवन पवार यांच्या हस्ते उमेश सोनवणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख वामनराव गायकवाड, महानगरप्रमूख अविनाश शिंदे, नाशिक तालुकाध्यक्ष बाळासाहेब गांगुर्डे, जिल्हानेते बाळासाहेब शिंदे, माजी नगरसेवक संजय साबळे, त्र्यंबकेश्वर युवक तालुकाध्यक्ष तानाजी गांगुर्डे, जिल्हा महासचिव जितेश शार्दूल, अँड प्रविण साळवे, मोहन सोनवणे, कृष्णा काशीद, संपत गांगुर्डे, संपत चहाळे, सक्रु शिद, योगेश रोकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये पिण्याचे पाणी, रस्ते,आरोग्याचा आदी मूलभूत प्रश्नापासून ग्रामस्थ वंचित असून अनेक प्रस्थापित पक्षांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केले आहे. परंतु लोकांचे प्रश्न जैसे थे असून या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आगामी काळात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यामातून रूपरेषा ठरविण्यात येईल. राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, जिल्हाध्यक्ष पवन पवार व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख वामनराव गायकवाड व जिल्हा कार्यकारिणीने माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. त्यास पूर्णपणे न्याय देऊन त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्य तळागाळात नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
- उमेश सोनवणे, तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, त्र्यंबकेश्वर