इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
मुंबई आग्रा महामार्गावरून नाशिककडे जाणाऱ्या मोटार सायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. आज रात्री पावणेदहाच्या सुमारास आठवा मैल परिसरात हा अपघात झाला. यामध्ये मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला. जखमी व्यक्ती इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील असून सध्या राजूर बहुला येथे वास्तव्यास आहे. नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी अपघातग्रस्ताला वेळेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले.
मुंबई आग्रा महामार्गावरील आठवा मैल भागात MH 15 BG 7837 ह्या मोटारसायकलीने किसन संतु शिरसाठ वय ४० रा. कावनई ता. इगतपुरी सध्या रा. राजूर बहुला हे नाशिकच्या दिशेने चालले होते. आज रात्री पावणेदहाच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यामध्ये ते गंभीरपणे जखमी झाले. नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना अपघाताची माहिती मिळताच ते तात्काळ दाखल झाले. त्यांनी समयसुचकतेने गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्याने जखमीचे प्राण वाचले.