मुकणे ग्रामपंचायत, श्रीनिवास हॉस्पिटल व आरोग्ययात्रा फाउंडेशनच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर संपन्न

प्रभाकर आवारी, इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

मुकणे ग्रामपंचायत व श्रीनिवास हॉस्पिटल नाशिक व आरोग्ययात्रा फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मुकणे येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर संपन्न झाले. घोटी बाजार समितीचे संचालक विष्णु पाटील राव, सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव, ग्रामपंचायत सदस्य रामदास राव, गणेश राव, आरोग्ययात्रा फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश चितोडकर आदींच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.

नाशिकचे प्रख्यात अस्थिरोग तज्ञ डॉ. ब्रिजभूषण महाजन, मूत्रविकार तज्ञ डॉ. नरसिंग माने यांसह सहकाऱ्यांनी नागरिकांच्या विविध तपासण्या केल्या. रक्त शर्करा व रक्तदाब, मुतखडा, गुडघ्यावरील, सांधेदुखी, मणक्याचे विकार आदी प्रोस्टेट ग्रंथी आजार तपासून औषधोपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. कोरोनाकाळात घ्यावयाच्या काळजी बाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

यावेळी सहकारी संस्थेचे संचालक गणेश राव, पोपट राव, शालेय समितीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर राव, माजी ग्रामपंचायत सदस्य काळु मुकणे, सचिन बोराडे, डॉ. सुभाष निकम आदींसह ग्रामपंचायत पदाधिकारी यांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.