इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वायघोळ या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी युवा कार्यकर्ते शरघुनाथ पोटिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच पुष्पा सुरेश झोले यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रामपंचायतीची विशेष सभा घेण्यात आली. या अगोदर सदस्यांत ठरलेल्या समझोता प्रमाणे पहिले अडीच वर्षे तत्कालीन उपसरपंच प्रकाश राऊत यांचा अडीच वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांनी स्वखुशीने राजीनामा दिला. त्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते. या पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत रघुनाथ पोटींदे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड ग्रामपंचायत कार्यालयात झाल्याची सरपंच पुष्पा झोले व ग्रामसेवक जे. ए. कुमावत यांनी घोषणा केली.
यावेळी तत्कालिन उपसरपंच प्रकाश राऊत, कुसूम किसन सापटे,मारुती धनगर, उषा महाले हे ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी हिरामण कोरडे संगणक चालक विष्णु दळवी उपस्थित होते. बिनविरोध निवडणुक झाल्यानंतर सदस्य आणि ग्रामस्थांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन रघुनाथ पोटींदे यांचा सत्कार व अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी सरपंच रघुनाथ धनगर सुरेश झोले, यशवंत धनगर, भारत बोरसे, हिरामण झोले, आनंदा कावरे, हरिदास राऊत, दशरथ महाले, देवीदास पवार, रावजी धनगर, ढवळु झोले, शिवराम धनगर, विलास लोखंडे, अर्जुन महाले, शिवराम महाले, अंबादास मेढे, प्रकाश मेढे, महादु धनगर आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी युवा नेते विनायक माळेकर, शिवसेना नेते मिथुन राऊत, रामचंद्र लिलके, चंदर राऊत, हरसुलच्या सरपंच सविता भगवान गावीत, हिरामण गावित, रघुनाथ गांगोडे, शिवसेना गण प्रमुख विठ्ठल पवार, हरसुल ग्रामपंचायतचे सदस्य राहुल शार्दुल, अशोक लांघे, महादेव नगरचे सरपंच विष्णु बेंडकोळी, निरगुडे ग्रामपंचायतचे सरपंच प्रविण तुंगार, हरसुल ग्रामपंचायतचे सदस्य अनिल बोरसे, भाजपाचे पावन बोरसे आदि मान्यवरांनी नवनिर्वाचीत उपसरपंच रघुनाथ पोटींदे यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सर्व ग्रामपंचायत सदस्यांना व गावातील जेष्ठ नागरिकांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणारी विकासकामे पाड्यामधील वस्तीतील प्रलंबित कामे, गावातील रस्ते पाणी योजना स्वच्छता गटार रोजना ही कामे अग्रकमाने हाती घेऊन स्वच्छ वायघोळ व सुंदर वायघोळ करण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करेल.
- रघुनाथ पांडुरंग पोटींदे, नवनिर्वाचित उपसरपंच वायघोळ