वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
शेतकऱ्यांना कर्जमाफी आघाडी सरकारने दिली, कोविड काळात फक्त शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. महाराष्ट्राला गरज आहे ती शिवसेनेची, त्यामुळे शिवसैनिकांनी आता पासूनच कामाला लागले पाहिजे. येणाऱ्या काळात जनतेचे प्रश्न आपण सरकारच्या माध्यमातून सोडवण्यासाठी शिवसैनिकानी सज्ज व्हावे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्या तसेच नगरपरिषदांच्या निवडणुकीत सर्वत्र शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्यासाठी शिवसैनिकांनी आतापासून शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून घरोघरी जावे. यासह शाखाप्रमुखांनी महाविकास आघाडीने राबविलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार निर्मला गावित, काशिनाथ मेंगाळ, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, रमेश गावित, सभापती सोमनाथ जोशी, जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, उपतालुकाप्रमुख कुलदीप चौधरी, युवासेना प्रमुख मोहन बऱ्हे, उपसरपंच अनिल भोपे, कचरू डुकरे, नंदलाल भागडे, गटनेते विठ्ठल लंगडे, रामदास भोर, संजय आरोटे, श्रीकांत काळे, आकाश खारके, अशोक सुरुडे, मथुरा जाधव, स्वाती कडू, माजी नगरसेवका अलका चौधरी आदी उपस्थित होते. शिवसंपर्क अभियान कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. घोटी गणात शिवसंपर्क अभियांचे नियोजन घोटी शहर अध्यक्ष गणेश काळे यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, राज्यात आघाडी सरकारने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेता सर्वांनी आतापासूनच कामाला लागले पाहिजे असे करंजकर यांनी सांगितले. यावेळी संजय जाधव, दौलत बोंडे, अरुणा जाधव, जालिंदर काळे, समाधान भागडे, शेखर दिवटे, दीपक गायकवाड, हिरामण कडू, अनिल काळे, विक्रम मुनोत, समीर ठाकुर, लक्ष्मण भगत, विलास रुपवते, विकास जाधव, भूषण घोटकर आदी उपस्थित होते.