
इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – इगतपुरी येथील जनता विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका नीलम बागुल यांनी सावित्रीबाई फुले, पर्यवेक्षक राजाराम पानसरे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. महिला शिक्षिका व विद्यार्थिनींचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका नीलम बागुल यांनी महिला सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे कौतुक केले. त्यांनी महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी शासनाच्या योजनांची माहिती देऊन आत्मनिर्भर महिला समाजाचा विकास घडवून आणते असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला. सूत्रसंचालन कैलास मोरे यांनी तर आभार भाऊसाहेब गाडे यांनी मानले.




