घोटी येथील पतिपत्नी, बालिका यांच्यासह 4 जण जखमी :
मद्यधुंद व्यक्ती अचानक आडवा आल्याने झाला अपघात

इगतपुरीनामा न्यूज, दि. 24

मुंबई आग्रा महामार्गावरील रायगडनगर जवळ अचानक मोटारसायकलला मद्यधुंद व्यक्ती आडवा आल्याने अपघात झाला. या घटनेत मोटारसायकलवरील पती, पत्नी आणि 6 वर्षाची बालिका जखमी झाली. मद्यपी व्यक्तीही जखमी झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना घोटीच्या खासगी रुग्णालयात आणि वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. ही घटना आज रात्री आठच्या दरम्यान घडली. MH 15 HW 5558 ह्या मोटारसायकलवरील सजल हरिचल विश्वास वय 32, सुवर्णा सजल विश्वास वय 23, श्रीया सजल विश्वास वय 6 वर्ष सर्व रा. घोटी बुद्रुक हे जखमी झाले. मद्यपी असलेल्या जखमी व्यक्तीचे नाव समजले नाही.

Leave a Reply

error: Content is protected !!