माजी सभापती गोपाळा लहांगे ह्या प्रभावी व्यक्तिमत्वाचा ‘हा’ आहे खरा इतिहास : वाडीवऱ्हे गटासह इगतपुरी मतदारसंघाला बदलण्याचे आहे सामर्थ्य 

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – आपल्या शब्दांच्या पलीकडे जाणारा आणि आपल्याला कायम वरचढ ठरणारा माणूस कोणालाही सत्ता स्थानावर नको असतो. सत्ता भोगत असतांना खऱ्या अर्थाने जनतेशी नाळ जुळलेला माणूस अभूतपूर्व परिवर्तन घडवून विकासाचे पर्व निर्माण करू शकतो. मग अनेक राजकीय व्यक्तींचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊन त्या समर्थ व्यक्तिमत्वाचे पर्व सुरु होते. यामुळे बऱ्याच जणांचे राजकीय आयुष्य संपुष्टात यायला सुरुवात होते. मग असे सक्षम नेतृत्वाचे खच्चीकरण आणि अवमूल्यन करण्याच्या हालचाली आणि षडयंत्र वेगाने सुरु होतात. येनकेन प्रकारे अशा माणसाच्या स्वभावाचा फायदा घेऊन लोकांमध्ये त्याबद्धल समज  गैरसमज पसरवले जातात. यासाठी सगळेच विरोधक एकत्र येऊन त्या व्यक्तिमत्वाला बाजूला करण्यासाठी जीवाचे रान करत असतात. वाडीवऱ्हे येथील सामान्य आदिवासी कुटुंबातील गोपाळा दगडू लहांगे यांच्याबाबत असे प्रकार गेली ३५ वर्ष सुरु आहेत. वाडीवऱ्हेसारख्या मोठ्या गावाचे सरपंच, तालुक्याचे सभापती म्हणून त्यांनी केलेली सर्वोत्तम कामगिरी अन्य राजकीय लोकांच्या चिंतेचा विषय ठरली. त्यामुळे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करण्यास प्रबळ दावा असतांना त्यांना डावलून बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवार दिला गेला.  त्याची पुनरावृत्ती २०१४ ला झाली. २०१९ आणि २०२४ ला सुद्धा गोपाळा लहांगे यांना कोणी उमेदवारी देऊ नये म्हणून शक्ती पणाला लावली. सर्व जातीधर्माच्या नागरिकांशी अतिशय जवळून संबंध आणि मतदारसंघात मोठी ताकद असूनही जाणीवपूर्वक त्यांना विधानसभेत जाण्यापासून रोखले गेले, जे संपूर्ण इगतपुरी मतदारसंघासाठी दुर्दैवी आहे. 

तालुक्याला अनेक आमदार, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि अनेक पदाधिकारी लाभले. पण विकासाच्या नावाने सगळीकडे बोंबाबोंब आहे. विकासाच्या योजना फक्त कागदावरच आणि ठराविक लोकांच्या मक्तेदाऱ्या झाल्यात. हा मतदारसंघ विकासाच्या प्रतीक्षेत आहे. यासाठी अतिशय पोटतिडिकेने गोपाळा दगडू लहांगे हे झटत असतात. यामुळेच गैरप्रकारांना समर्थन देणारे पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे अधिकारी त्यांनी संतप्त भूमिका घेऊन झापून काढले. फक्त कागदोपत्री विकासाच्या योजना दाखवून लोकांचा पैसा गिळणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी काम उभे केले. यामुळेच ज्यांना ज्यांना गोपाळा लहांगे अडचणीचे ठरले त्यांनी त्यांनी जनतेत त्यांच्याबाबत समज गैरसमज मोठ्या प्रमाणावर पसरवले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटातून गोपाळा लहांगे हे सक्षमतेने उमेदवारी करणार आहेत. हे प्रभावी व्यक्तिमत्व ह्या गटात अतिशय लोकप्रिय आहे. गेल्या ३५ वर्षांपासून त्यांना सत्तेपासून दूर ठेवणाऱ्यांना चांगली अद्धल घडवण्यासाठी वाडीवऱ्हे गटातील सामान्य नागरिकांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. लोकांसाठी प्रामाणिकपणे आणि विश्वासाने विकासाची गंगा आणण्यासाठी त्यांना जिल्हा परिषदेत पाठवण्यासाठी प्रचाराची धुरा सामान्य माणसांनी हाती घेतल्याचे दिसते. राजकारणात एकाच कुटुंबाची मक्तेदारी आणि स्वतःच्या फायद्यासाठी मलई खाणाऱ्या प्रवृत्तीसाठी गोपाळा लहांगे हा अतिशय समर्थ पर्याय आहे. त्यांच्याबाबतचे समज गैरसमज आता चांगले माहित झाले असून ह्या व्यक्तीला संधी देण्याबाबत सर्वांचे एकमत झालेले आहे. स्व. लोकनेते दादासाहेब गुळवे आणि स्व. अण्णासाहेब कातोरे यांची प्रेरणा घेऊन चांगले काम उभे करू असा गोपाळा लहांगे यांचा संकल्प आहे. त्यांच्याशी मुक्तपणे बोलण्यासाठी कोणाही व्यक्तीला 9923460246 ह्या मोबाईलवर संपर्क साधता येईल. ( क्रमश:)

error: Content is protected !!