इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
प्रहार दिव्यांग संघटना इगतपुरी तालुका यांच्या मागणीची कांचनगाव ग्रामपंचायतीने दखल घेतली आहे. दिव्यांग निधी ५ टक्के खर्च शासनाच्या आदेशानुसार करण्यात आला आहे. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग ५ टक्के निधी दिव्यांगांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. आज कांचनगावच्या सरपंच संगीता भगत, उपसरपंच अरुणा दुभाषे, ग्रामपंचायत सदस्य सतीश गव्हाणे, विजय चंद्रमोरे, मदन बिन्रर, ग्रामसेवक रामेश्वर बाचकर यांनी दिव्यांगांना निधी वाटप केला. मनिष सुनिल चंद्रमोरे, देविदास ठकाजी कडु, समाधान अंकुश कडू, गौतम शिवराम दुभाषे, नितीन लक्ष्मण भगत, विजया गजीराम गव्हाणे, राणु नारायण माळी, शोभा सहादु चंद्रमोरे, दत्तु नथु गव्हाणे, दिलीप अशोक चंद्रमोरे ह्या दहा दिव्यांग बांधवांना चेक स्वरुपात हा निधी देण्यात आला आहे. दिवाळी काळात भेट म्हणून हा निधी उपलब्ध झाल्याने दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त केले. यावेळी प्रहार तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे पाटील, तालुका उपाध्यक्ष सोपान परदेशी, विक्रम दुभाषे, अंकुश कडू उपस्थित होते.