
इगतपुरीनामा न्यूज – तब्बल दशकभर इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रभावी नेतृत्व करून जनसामान्य माणसांचा आणि आदिवासी बहुजनांचा बुलंद आवाज असलेले माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र युवा नेते जयप्रकाश उर्फ बाळासाहेब शिवराम झोले यांनी आज धनोत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेसाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर उपविभागीय कार्यालयात आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवारी अर्ज व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज सादर करण्याअगोदर कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने पाथर्डी फाट्यावर जोरदार शक्ती प्रदर्शन केले. माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र युवा नेते जयप्रकाश उर्फ बाळासाहेब शिवराम झोले यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नाकारले मात्र मात्र त्यांनी अजित दादांचे विचार डोळ्यासमोर ठेऊन उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे.स्थानिक भूमिपुत्र असलेले बाळासाहेब झोले यांच्या उमेदवारीबाबत जनतेमधून सहानुभूतीची लाट तयार झाली आहे. अनेक जण त्यांना पाठींबा देत आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात बाळासाहेब शिवराम झोले यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे. येणाऱ्या निवडणुकीत ते नक्कीच काहीतरी करिष्मा करणार अशी चर्चा जोर धरत आहे. अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी हेमंत झोले, भाजपचे जिल्हा सदस्यव रमेश निसरड, छावा मराठा सेना संस्थापक अध्यक्ष सुनील भोर, विलास झोले, सीमाताई झोले, कृष्णा कुंदे, शैला कुंदे, भाऊसाहेब गायकवाड, विजय पाटील, डॉ. गोरख घारे, सामाजिक कार्यकर्ते अनिल निसरड, संपत रोंगटे, इम्रान भाई सय्यद, योगेश नाठे, संतोष मुसळे, गणेश घोटकर, संपत पोटकुले, रोहन सोनवणे, विठ्ठल पोटकुले, दत्तू पोटकुले, शिवाजी झोले, श्रीराम पोटकुले, भावराव रोंगटे, दिनेश साळुंखे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.