ग्रामीण साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी लोकनेते गोरख बोडके यांची निवड : साहित्य मंडळाचे पुंजाजी मालुंजकर यांची घोषणा

इगतपुरीनामा न्यूज, दि. 28

5 नोव्हेंबरला होणाऱ्या इगतपुरी तालुका ग्रामीण साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी जिल्हा नियोजन समिती सदस्य लोकनेते गोरख बोडके यांची निवड झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य आणि विकासासाठी तत्पर लोकनेता अशी त्यांची विविधांगी ओळख असून स्वागताध्यक्ष म्हणून ते अव्वल आहेत अशी प्रतिक्रिया तालुक्यात उमटली आहे. 5 आणि 6 नोव्हेंबरला नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील मानवधन विद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या 23 व्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे हे असणार आहेत. उदघाटक जेष्ठ साहित्यिक प्रा. लक्ष्मण महाडिक असणार आहेत. ह्या साहित्य संमेलनात राज्याच्या विविध भागातील साहित्यिक हजेरी लावतात.

साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जनतेच्या भावना शासनाला आणि समाजाला समजतात. ह्या उत्कट भावना आगामी काळात चांगले काम करण्यासाठी दिशादर्शक ठरतात. म्हणून ह्या कामासाठी आवश्यक ते सर्व सहाय्य करू असे नूतन स्वागताध्यक्ष लोकनेते गोरख बोडके यांनी म्हटले आहे. या साहित्य संमेलनात सर्व साहित्यिक, साहित्य प्रेमी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन साहित्य मंडळाचे अध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, स्वागताध्यक्ष लोकनेते गोरख बोडके, ॲड. रतनकुमार इचम, बाळासाहेब पलटणे, ॲड. ज्ञानेश्वर गुळवे, हिरामण शिंदे, रवींद्र पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!