इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
दिव्यांगांचे दैवत राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांसाठी विशेष “दिव्यांग जीवन रक्षक” लसीकरण मोहीम आज इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये राबवण्यात आली. श्री. कडू यांच्यामुळे महाराष्ट्रातील दिव्यांगासाठी आजपर्यंत एकूण 43 शासन निर्णय पारित झाले आहेत. दिव्यांग व्यक्तीला सन्मानाने जगण्याकरिता वारंवार प्रयत्न, दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलने करून बच्चू कडू दिव्यांगांचे तारणहार बनले आहेत. स्वतःवर जवळपास ३५० गुन्हे दाखल करून घेतलेले व्यक्तिमत्व राज्यमंत्री अपंगांचे हृदयसम्राट बच्चु कडू यांचा वाढदिवस आज इगतपुरीत साजरा करण्यात आला.
कोरोना महामारीत दिव्यांगांचे जीवन वाचवणारी जीवनरक्षक ठरणारी कोरोना प्रतिबंधक लस दिव्यांगांना बच्चू कडू यांच्या वाढदिवसाला मिळण्याचे नियोजन प्रहार अपंग क्रांती संस्था इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाकडून करण्यात आले. त्यानुसार विविध दिव्यांग बांधवांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे, पासलकर यांच्या मदतीने लसीकरण मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम इगतपुरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी कायमस्वरूपी राबविण्यात येत असून जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रहार क्रांती संघटनेच्यावतीने संतोष मानकर यांनी केले आहे. तालुकाप्रमुख नितीन गव्हाणे, उपतालुकाप्रमुख सोपान परदेशी, शहर प्रमुख योगेश चव्हाण, वैशाली कर्डक, उमेश खारके, विशाल मनोहर, शंकर सदगीर, अनिल कोरडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.