इगतपुरी रेव्ह पार्टी : “अशी” झाली पोलीस कारवाई ; सविस्तर घटना आहे ‘अशी”

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानस रिसॉर्ट हद्दीतील स्काय ताज विलातील एका बंगल्यात दि. २७ रोजी पहाटे २ वाजेच्या दरम्यान रेव्ह पार्टी सुरू असल्याची गुप्त खबर नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांना मिळाली. यावेळी पोलीसांनी मध्यरात्री स्काय ताज विला बंगल्यावर छापा मारला असता यात ड्रग्ज, हुक्का आदी मादक द्रव्यासह तरुण तरुणी बिभत्स अवस्थेत सुमारे २२ जण आढळून आले. या रेव्ह पार्टी प्रकरणी १० पुरुष आणि १२ महिलांचा समावेश असून यातील चार महिला फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या व १ महिला बिग बॉस या शोमध्ये काम केले असल्याचे समजते.
या घटनेत संंशयित पियुष शेट्टीया, आरव शर्मा, विशाल मेहता, रोहित अरोरा, अकीब खान, वरून बाफणा, करिष्मा, चांदणी भटीजा, श्रुती शेट्टी, रूचीरा नार्वेकर, विदेशी महिला अझार फारनुद, शनैया कौर, हिना पांचाल, अषिता, शिना, प्रिती चौधरी, कौशीकी, यांच्यातील चार जणांचे नावे अद्याप पोलीसांना मिळाले नाही. या पोलीसी छाप्यात घटनास्थळाहून कॅमेरा, ट्राय पॉड, मादक द्रव्य आढळून आल्याने पोलीसांनी ही कारवाई केल्याचे समजते.

सविस्तर माहिती अशी की, या घटनेतील फिर्यादी विभा दिनेशभाई गोंडलीया, वय २५ वर्ष, रा. राजकोट युनिर्वसीटी रोड, मुंबई याने पोलीसांना दिलेल्या फिर्यादीवरून ऑनलाइन कपडे विक्री व्यवसायाचा चार वर्षापासुन घटनेतील आरोपी निरज ( अरव ) ललीत शर्मा , सुराणा यांची ओळख असल्याने पियुष शहा याच्या वाढदिवसाची पार्टी देण्यासाठी दि. २५ रोजी सकाळी फिर्यादीसह आरोपी आरव, रूचीरा नार्वेकर, आकीब खान हे इगतपुरी येथे मानस रिसॉर्ट लगत असलेल्या स्काय ताज व्हिला बंगला नं. ५ ते ८ येथे पार्टीसाठी थांबले. यात सुमारे २२ जण सदर ठिकाणी रात्री १२ वाजेला पियुष याचा वाढदिवसाचा केक कापुन दि. २६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारात रेव्ह पार्टीला सुरवात झाली. घटनेतील सर्व तरुण तरुणी मद्दधुंद व नशेत नाच गाणी धिंगाणा करीत काही हुक्का चरस, गांजा आणि ड्रग्जचे डोस घेत नशेच्या पावडरसह मादक पदार्थाचे सेवन सुरू असतांना मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारात पोलीसांनी धाड मारली. यावेळी मद्यधूंद संशयित व मुद्देमालासह सर्व आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेत सायंकाळी उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शहरातील महामार्गालगत व निसर्ग व डोंगर भागात विविध खाजगी बंगले आणि रिसॉर्ट असुन यात अनेकदा रेव्ह पार्टी व मादक पदार्थाची तस्करी खुल्या आम सुरू असते. या प्रसंगी छाप्यात संशयित १० पुरूष व १२ महिलां पैकी अनेक सहकारी ही मिळुन येण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली असल्याने काहींनी रात्रीतुनच पळ काढल्याचे समजते. सदर घटनेतील संशयीतांपैकी काही फिल्म अभिनेते गेल्याची इगतपुरी तालुक्यात चर्चा सुरू आहे.

या घटनेत नायजेरीयन विदेशी पुरूषाला गुन्हे शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले असुन त्याचेकडे नशेली पदार्थ कोकीन, डोपींग, हैरोइन यासह विदेशी नशा पावडर मिळून आल्याने मोठे ड्रग्ज रॅकेट समोर येण्याची शकयता पोलीसांनी व्यक्त केली. मराठी बिग बॉस शो मधील नायीका हिना पांचाल तसेच हिंदी व पाश्यमात्य नृत्य दिग्दर्शीका व कलाकारांचा या घटनेत समावेश असल्याने पुन्हा एकदा सिनेसृष्टी वादाच्या भोवऱ्यात आली आहे.

कारवाईमध्ये ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर ग्रामीण पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलिस उपअधीक्षक अर्जुन भोसले, गुन्हे पोलीस शाखेचे ए. एस. आय. नवनाथ गुरुळे, पोलीस हवालदार  बी. बी. ठाकरे, पोलीस नाईक जगताप, संदीप हांडगे, सचिन पिंगळ, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दिवटे, शिवाजी लोहरे, वैभव वाणी, मुकेश महिरे, राज चौधरी, होमगार्ड तालुका समादेशक शरीफ शेख आदीनी भाग घेतला.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!