जुनी पाणी पुरवठा योजना झाली नवी
इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे येथील पिण्याच्या पाण्याची जुनी समस्या आज सोडवण्यात आली. ही समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केलेल्या अविरत प्रयत्नांना यश मिळाले. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोग निधीतून क्रांतिवीर व्ही. एन. नाईक माध्यमिक विद्यालय आणि शेजारील नागरिकांची कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्याची वचनपूर्ती आज करण्यात आली. यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
बेलगाव तऱ्हाळे येथील पूर्वीच्या पाणी योजनेची पाईपलाईन अतिशय जीर्ण झाल्याने ग्रामस्थांना अडचण निर्माण होत होती. अनेक ठिकाणी यामुळे पोहोचत नव्हते. पाणी योजनेला गती देण्याचे काम सुरू असतांनाच कोरोना महामारीमुळे काम प्रलंबित राहत गेले. जुन्या पाईपलाईनचे काम बदलून आता लोखंडी पाईप टाकण्यात आले आहेत. उंच सखल आदी सर्व भागात पाणी पोहोचण्यासाठी खबरदारी घेतली गेली आहे. अनेकांना नळ कनेक्शन देण्यात आले असून काही अपूर्ण कामेही युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. काही दिवसातच ही योजना पूर्णत्वाकडे जाईल असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सरपंच अशोक पोपट मोरे, उपसरपंच सुवर्णा हिरामण आव्हाड, पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, हिरामण आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य संतोष वारुंगसे, अंकुश मोरे, समाधान वारुंगसे, बबाबाई मोरे उपस्थित होते.
यावेळी अशोक यशवंत आव्हाड, पोपटराव मोरे, भाऊसाहेब आव्हाड, विलास आव्हाड, संजय आव्हाड, तानाजी आव्हाड, भरत वारुंगसे, संदीप वारुंगसे, काकड, देवराम आव्हाड, वाळू आव्हाड, गोरख बोराडे, नारायण आव्हाड, शरद गीते, सचिन आव्हाड, कचरू आव्हाड, अनिल पवार, अंकुश जमधडे आदी ग्रामस्थ हजर होते.
पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याने स्वप्नपूर्ती झाल्याचे समाधान आहे. योजनेमुळे अनेक ग्रामस्थांना फायदा होणार असून ह्या कामासाठी योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात व्यक्तींचे ऋण व्यक्त करणे आमचे कर्तव्य आहे.
- पांडुरंग वारुंगसे, माजी उपसभापती इगतपुरी