बालकवी पियुष गांगुर्डे
इयत्ता ७ वी, ज. वि. पवननगर
ज्यांनी आपले जीवन
गरीबांसाठी लावले पणास
प्रणाम माझा
राजर्षी शाहूंच्या जीवनास
स्वभाषेबद्दल होता
त्यांना अभिमान
घराघरात शिक्षण नेण्यास
केले जीवाचे रान
भीमकाय शरीरयष्टी
चंचलता हे त्यांचे विशेष
राजा असून साधा होता
त्यांचा वेश
लक्ष होते महाराजांचे
शेती उद्योगातही
नकार होता महाराजांचा
जातीभेद अंधश्रद्धेलाही
महाराजांना होता कुस्ती
शिकारीत विशेष रस
अनोळखीच्या समोर आले
तर व्हायचे मनात धस्स
स्रियांचे स्वातंत्र्य शिक्षण
यावर होता भर
असे महाराज राबले
जनतेसाठी आयुष्यभर
वस्तीगृह प्रत्येक
जातीधर्मास काढले
गरीबांसाठी शिक्षणाचे
दार उघडले
महाराजांचे जीवन
कीर्ती त्यांची अमर
डोके ठेवितो मी अशा
महाराजांच्या चरणावर