इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
नाशिकचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली पूर्वतयारी, ऑक्सीजन प्लांटची पहाणी त्यांनी केली. मर्यादित संख्येपेक्षा जास्त कोविड रुग्णसंख्या जास्त असतांनाही इगतपुरी तालुक्यातील एकमेव कोविड सेंटर असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाविषयी त्यांनी अतीव समाधान व्यक्त केले. डॉ. थोरात यांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचे यावेळी कौतुक केले.
यावेळी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यविषयक सर्व शासकीय कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरुपा देवरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, डॉ. पूनम पाटील, डॉ. शिल्पा थोरात, कार्यालयीन अधिक्षक श्री. पासलकर, विशाल आदमाने, चकोर ब्रदर व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.