इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
“होता जिवा म्हणून वाचला शिवा” हे वाक्य ज्यांच्यामुळे इतिहासात अजरामर झाले ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक शूरवीर “जिवबा महाला संकपाळ” आहेत. त्यांची जयंती महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरावर प्रसिद्ध कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी साजरी केली. जिवा महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज व जिवा महाले यांच्या नावाचा जोरदार जयघोष निनादला.
शूरवीर जिवा महाले यांच्या जयंती कार्यक्रमावेळी कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, उपाध्यक्ष गजानन चव्हाण, सचिव बाळासाहेब आरोटे, सलून असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे, अशोक हेमके, प्रवीण भटाटे, काळू भोर, नितीन भागवत, ज्ञानेश्वर मांडे, विकास जाधव, बाळासाहेब वाजे, निलेश पवार, पंढरीनाथ दुर्गुडे, सोमनाथ भगत, उमेश दिवाकर, निलेश आंबेकर, आदेश भगत, संतोष म्हसणे, बबलू बोराडे, निलेश बोराडे, बाळू भोईर, बाळू नवले, मयूर मराडे, भगवान तोकडे, रोशन लहाने, चेतन छत्रे, संकेत वाडेकर, चेतन जाधव, दीपक मराडे, भानुदास जाधव, देविदास पाखरे, रमेश हेमके, कदम सर, दर्शन भोर आदी गिर्यारोहक सहभागी झाले होते.