इगतपुरीनामा न्यूज, दि.९
कॅनरा बँकेच्या अंबड शाखेने सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर येथील श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान यांना २ संगणक प्रदान केले. यावेळी झालेल्या समारंभाप्रसंगी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानचे अध्यक्ष स्वामी श्री कंठानंद यांनी दातृत्व विकासाचे महत्त्व समजावून सांगितले. कॅनरा बँकेचे विभागीय व्यवस्थापक हरीश गुंडेकर यांनी कॅनरा बँकेची सामाजिक बांधिलकी उपक्रमा अंतर्गत चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरित होऊन वाटचाल करावी असे प्रतिपादन त्यांनी केले. रमेश चौगुले, मनीष धभई यांनी बँकेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाप्रसंगी कॅनरा बँकेचे विभागीय व्यवस्थापक हरिष गुंडेकर, रमेश चौगुले, मनीष धभई, श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानचे अध्यक्ष स्वामी श्रीकण्ठानंद व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानच्या माध्यमातून विविध भागात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जात असतात.
