वट सावित्री पोर्णिमा : इगतपुरीत ऑक्सीजनयुक्त औषधी रोपांचे वृक्षारोपण

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

इगतपुरीतील महादेव मंदिर परिसरात वट सावित्री पोर्णिमेनिमित्त श्री महादेव मंदिर ट्रस्ट, माजी नगरसेवक किसनराव कर्पे मामा, स्व. शामसिंग परदेशी यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ऑक्सिजन देणाऱ्या विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण मंदिर परिसरात करण्यात आले. ५० रोपे पुजा करणाऱ्या महिलांना वाटप करण्यात आले.
या उपक्रमात नगरसेविका रोशनी परदेशी, आरती कर्पे, वैशाली कर्पे, अरुणा कोमकर, अलका शिंदे, तेजु कोमकर, हेमा परदेशी, मंगला परदेशी, सविता गांगुर्डे, भाटी मावशी, सविता परदेशी आदींनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी महादेव मंदिरचे ट्रस्टी तथा माजी उपनगराध्यक्ष सतीश कर्पे, संजय परदेशी, नंदू बागलाने, चिंतामण बगाड, शिवकुमार परदेशी, अश्विन कर्पे, सागर मंडले, आकाश गादेकर यांच्यासह बालमित्र समाज मंडळ, महाराणा प्रताप मित्र मंडळ, शनी चौक मित्र मंडळ, ओम बजरंग मित्र मंडळ, श्री. साई साहाय्य समितीचे सहकार्य लाभले.