इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
इगतपुरी येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत बंदिस्त प्रेक्षागृह बांधण्यासाठी एक कोटी तीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आणि इगतपुरी तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे महाविद्यालयास अनुदान मंजुरीचे पत्र प्राप्त झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. आर. भाबड व संस्थेचे संचालक भाऊसाहेब खातळे यांनी दिली.
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयास शासनाकडून विकास कामासाठी सहाय्य मिळणेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, संचालक भाऊसाहेब खातळे तसेच शालेय व्यवस्थापन समिती आणि महाविद्यालय विकास समितीच्या सर्व सदस्यांनी व परिसरातील मान्यवरांनी सतत पाठपुरावा केला होता. आमदार हिरामण खोसकर यांनी महाविद्यालयासाठी शासनाकडून निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आमदार हिरामण खोसकर यांनी शासनाकडून महाविद्यालयाच्या विकासकामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मविप्र समाजाचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, सरचिटणीस निलीमाताई पवार, उपसभापती राघो अहिरे, चिटणीस डॉ. सुनिल ढिकले, संचालक भाऊसाहेब खातळे, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, शालेय व महाविद्यालय विकास समितीच्या सदस्यांनी आणि परिसरातील मान्यवरांनी आमदार हिरामण खोसकर यांचे आभार व्यक्त केले.
( बातमी लेखन : प्रा. देविदास गिरी, उपप्राचार्य )