साकुर फाट्यावर २ मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक : २ जण जागीच ठार तर ३ जण गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज – घोटी सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्याच्या पुढे कोठुळे लॉन्स जवळ झालेल्या अपघातात २ जन ठार झाले असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. सिन्नरकडून येणारी मोटरसायकल क्रमांक MH15 HS 6852 व मोटरसायकल क्रमांक MH15 GK 9314 या दोन मोटरसायकलीला घोटीकडून सिन्नरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला. ही घटना रात्री साडेबाराच्या सुमाराला घडली असून अपघात करणारे वाहन पळून गेले आहे. ह्या अपघातात प्रकाश उल्हास टिळे वय 35 रा. शेणित, सोमनाथ पांडुरंग सदगीर वय 36 रा. पारदेवी हे दोघे जागीच ठार झाले. गोकुळ किसन बिन्नर वय 38 रा. पारदेवी, सार्थक भास्कर जाधव वय 12 रा. शेणित हे दोन गंभीर जखमी असून ओमकार प्रकाश टिळे वय 13 रा. शेणित हा किरकोळ जखमी आहे. सर्वजखमींना एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!