वंदनीय नागोराव महाराज बहादूरे भक्त निवासाचे उद्या साकुर येथे उदघाटन : आमदार हिरामण खोसकर, ॲड. संदीप गुळवे यांच्या हस्ते होणार उदघाटन सोहळा

इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील गुरुवर्य ब्रम्हलीन हभप वंदनीय नागोराव महाराज बहाद्दुरे यांचे आध्यात्मिक कार्य सर्वदूर पसरलेले आहे. ह्या कार्यामुळे नेहमीच भक्तांची गर्दी होत असते. भक्तांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी साकुर ता. इगतपुरी येथे भक्त निवास इमारतीचा उदघाटन सोहळा उद्या शनिवार दि. 11 ला सकाळी 10 वाजता होणार आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. संदीप गुळवे यांच्या हस्ते उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे. नागोराव महाराज बहादूरे यांनी आपल्या अलौकिक कार्यामुळे ह्या परिसरात मोठे काम उभे केलेले आहे. त्यामुळे भाविक आणि ग्रामस्थांकडून वंदनीय महाराजांबद्धल मोठी श्रद्धा आहे.

ह्या नेत्रदीपक कार्यक्रमाला भाविक आणि सर्व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन साकुरचे सरपंच विनोद साळुबा आवारी, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक, सर्व माजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा चेअरमन, माजी पोलीस पाटील, हनुमान मंदिर ट्रस्ट अध्यक्ष, सर्व संचालक, जेष्ठ भजनी मंडळ, युवा भजनी मंडळ, साकुर गावातील सर्व तालुका, जिल्हा पदाधिकरी आणि  समस्त साकुर ग्रामस्थ यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!