नाशिक जिल्ह्यात राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचा दौरा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

नाशिक जिल्ह्यात राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानुसार उद्या दि. २३ आणि परवा दि. २४ जुनला नाशिक जिल्हयात आदिवासी क्षेत्र आढावा समितीचा बैठक दौरा आयोजित करण्यात आला आहे. आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जाचे ना. विवेकभाऊ पंडित यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
इगतपुरी तालुक्यातील अधिकाऱ्यांसाठी शासकीय माध्यमिक इंग्रजी माध्यम आश्रमशाळा मुंढेगाव येथे उद्या २३ जूनला सकाळी ११ वाजता आढावा बैठक होईल. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अधिकाऱ्यांसाठी उद्याच दुपारी ३ वाजता तहसिल कार्यालय बैठक सभागृह त्र्यंबकेश्वर येथे बैठक होईल. दिंडोरी व पेठ तालुक्यातील अधिकाऱ्यांसाठी परवा दि. २४  ला पंचायत समिती कार्यालय दिंडोरी येथे दुपारी ३ वाजता बैठक होणार आहे.

आढावा बैठकीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण, उपविभागीय अधिकारी, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक, जिल्हा बालविकास अधिकारी, नाशिक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसिलदार, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, गटविकास अधिकारी,पंचायत समिती नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, पुरवठा अधिकारी, नाशिक , इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, तालुका आरोग्य अधिकारी, जि.प. नाशिक इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ हे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

विवेकजी पंडित अध्यक्ष, ( राज्यमंत्री दर्जा प्राप्त ) यांच्या
अध्यक्षतेखाली राज्यातील आदिवासी भागात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा ह्या बैठकीत घेतला जाणार आहे. आढावा बैठक केवळ अधिकाऱ्यासोबत होणार असुन अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाच्या माहिती वेळेत माहितीसह स्वतः उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!