वासाळी येथे विवाहितेवर बलात्कार ; संशयिताला पोलिसांकडून अटक

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

पतीशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आता तुझ्याकडेही पाहतो असे म्हणत पती बरोबर भांडण केलेल्या युवकाने एका मजुर महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली. इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथील मजुरीवर आलेल्या मजुर महिलेवर वासाळी गावातीलच एका युवकाने बलात्कार केल्याची फिर्याद पिडीत महिलेने घोटी पोलीस ठाण्यात दिली असुन पोलीसांनी या प्रकरणी सदर संशयितास अटक केली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वासाळी तालुका इगतपुरी येथे विहिराला बोअर मारण्याचे काम करणारे दांपत्य मजुरीवर आले आहे. यातील महिलेच्या पतीचे गावातच राहणाऱ्या रंगनाथ रामनाथ काठे, वय ३० वर्ष, राहणार वासाळी याच्या बरोबर दि. १३ जुन रोजी सायंकाळी भांडण झाले. त्याच वेळी रात्री ८ : ३० वाजता या महिलेच्या घरी जाऊन महिलेच्या पतीला पुन्हा मारहाण केली. या भांडणात ही महिला पतीला सोडवण्यास गेली असता तुझा नवरा गेल्यावर तुझ्याकडेही बघतो असे म्हणत रंगनाथ काठे याने तीला दम दिला. या नंतर काही वेळाने संशयिताने तिला डोंगराकडे ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
महिलेने आरडाओरडा करताच संशयित घटनास्थळावरून फरार झाला. याबाबत पिडीत महिलेने घोटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगुन फिर्याद दिली. याबाबत घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे, सहायक पोलीस निरीक्षक श्रध्दा गंधास, सहायक उपनिरीक्षक अनिल धुमसे आदीनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितास अटक केली. त्याविरोधात भादवि कलम ३७६/(१), ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रध्दा गंधास करीत आहे.