किरण रायकर, इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि जातात. मात्र कोणत्या लोकप्रतिनिधींनी कोणती कामे केली याचा हिशोब जनतेकडे असतो. खोसकर परिवाराला मतदारसंघातील जनतेने ज्या ज्या वेळी सेवा करण्याची संधी दिली त्या त्या त्यावेळी मतदारसंघाचा विकास झाला. हा विकासाचा वारसा डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या स्मरणात राहील, असा मतदारसंघाचा विकास करून दाखवणार आहे असे प्रतिपादन आमदार पुत्र वामन खोसकर यांनी केले.
इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील स्थानिक आमदार निधीतून मारूती मंदिरा समोरील सभामंडप इमारतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार पुत्र वामन खोसकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, जेष्ठ नेते ज्ञानेश्वर झेंडे, राजाराम पाटील, त्र्यंबक बाबा, कावनईच्या सरपंच सुनीता पाटील, ग्रामपंचायत सदस्य किरण रायकर, नंदू शेलार, गोपाळ पाटील, सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील, दिगंबर पाटील, संदीप सिरसाट, ठेकेदार तेजस गोवर्धने, प्रसाद मुरकुटे, ग्रामसेवक शरद रहाडे, सोमनाथ पाटील, दत्तू कवटे, खंडूसिंग परदेशी, दिगंबर सिरसाट, उपसरपंच शिवाजी कवटे उपस्थित होते.