![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/06/IMG-20210614-WA0032-1.jpg)
इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इगतपुरी तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. न्हायडी डोंगरावर लावलेल्या विविध वृक्षांसह राजसाहेब ठाकरे यांचा अभूतपूर्व वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राजसैनिकांनी उपक्रमात सहभागी होऊन वाढदिवस पार पाडला.
२०१९ मध्ये घोटी येथील न्हायडी डोंगराच्या पायथ्याशी सॅमसोनाइट कंपनीच्या मदतीने राजसैनिकांनी ४९० विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली होती. त्यावेळी उपयुक्त रोपांची लागवड करून राजसाहेब ठाकरेंचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. राजसैनिक व सॅमसोनाइट कंपनीचे कर्मचारी दरवर्षी ह्या वृक्षांना शेणखत टाकून उन्हाळ्यात पाणी घालीत असत. आजमितीला ह्या वृक्षांची उंची ७ ते ८ फूट पर्यंत वाढलेली आहे. आज पुन्हा मनसे पदाधिकाऱ्यानी राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या वृक्षांची सजावट करून पूजा केली. आदिवासी बालकांच्या हस्ते केक कापून त्या वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या उपक्रमात मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे, सॅमसोनाईट कंपनीचे व्यवस्थापक महाजन साहेब जिल्हा सचिव अभिजित कुलकर्णी, उपजिल्हाध्यक्ष आत्माराम मते, सरपंच रामदास आडोळे, तालुकाध्यक्ष कृष्णा भगत, उपतालुकाध्यक्ष संजय सहाणे, रामदास चव्हाण, गणेश मुसळे, गिर्यारोहक काळू भोर, बाळू आरोटे, प्रवीण भटाटे, अशोक हेमके व इतर राजसैनिक उपस्थित होते.