इगतपुरी तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वेगाने घोडदौड

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत इगतपुरी तालुक्यातील दैनंदिन रुग्णसंख्या चिंताजनक पातळीवर गेली होती. त्यामुळे घबराट पसरत असल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली होते. आता लाट ओसरत असल्याने सध्याची रुग्णसंख्या इगतपुरी तालुक्यात नीचांकी पातळीवर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्य विभाग आणि इतर सर्व यंत्रणांच्या समन्वयाने कोरोनावर तालुक्याने चांगली मात केली आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आणणाऱ्या सर्वांबाबत जनतेत कृतज्ञता व्यक्त होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमही विविध भागात सुरू आहे.

दरम्यान आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या वैद्यकीय अहवालानुसार १० कोरोना बाधित व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आज फक्त ३ व्यक्तींचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तालुक्यातील दोन्ही कोविड सेंटरमध्ये आज दिवस अखेर फक्त ५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी इगतपुरीनामा सोबत बोलतांना दिली. लवकरच आपला तालुका कोरोनामुक्त होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. थोडीफार लक्षणे होती. मनाला काळजी वाटायला लागली. माझे नातेवाईक माधव बोकड ( चुंचाळे ) यांनी मला बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधीची माहिती दिली. विलगीकरणाबरोबर ह्या आयुर्वेदिक गोळ्यांचेही नियमित सेवन केल्याने लक्षणे निघून गेली. आठवडाभराने पुन्हा कोरोना चाचणी केली. ही चाचणी निगेटिव्ह आली. आमचा परिवार आणि नातेवाईक, मित्र मंडळी आता सगळे ह्या गोळ्यांचे सेवन करून कोरोना पासून स्वतःचा बचाव करत आहोत. 
- बाजीराव माळेकर, माळेकरवाडी वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी

Leave a Reply

error: Content is protected !!