घोटी खुर्द येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला उदंड प्रतिसाद

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

घोटी खुर्द येथील आरोग्य वर्धिनी केंद्र येथे धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियोजनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. धामणगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय शेगावकर, डाॅ. संदीप वेढे यांनी  भेट देऊन कामाची पाहणी केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. आगामी काळात १०० टक्के लसीकरण करून घोटी खुर्द ओळखले जाईल असे पदाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमासाठी घोटी खुर्दच्या सरपंच ताई माणिक बिन्नर, उपसरपंच कैलास सुभाष फोकणे, सामाजिक कार्यकर्ते आत्माराम फोकणे, पोलीस पाटील कैलास फोकणे, पांडुरंग रोंगटे, शिवाजी फोकणे, एकनाथ म्हसळे, ग्रामसेवक डी. बी. कोळपे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी सहकार्य केले.

समुदाय आरोग्य अधिकरी डाॅ. प्रतिभा खोब्रागडे, विजय आखाडे, आरोग्य सेवक भरत जाधव, मुरली ठाकुर, राजु जारवाळ, महेश वालझाडे, अनिल मुंढे, वाहन चालक शरद घाणे, आरोग्य सेविका वनिता कुलकर्णी, एम. एम. कुलकर्णी, प्रमिला नवले, आशा फॅसिलिटर ज्योती टोचे, आशा बैरागी अंगणवाडी सेविका अनिता बाळासाहेब फोकणे, अश्विनी फोकणे, मदतनिस सिंधु बोराडे आदींनी लसीकरण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.