व्हिटीसी फाट्यावर सलग दुसऱ्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
मुंबई आग्रा महामार्गावरील व्हिटीसी फाट्यावर दोन मोटारसायकलींची समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला. यामध्ये २ युवक गंभीर जखमी झाले आहेत. नरेन्द्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी अपघातग्रस्त युवकांना तात्काळ नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. व्हिटीसी फाट्यावरील  दिवसभरात हा दुसरा अपघात असून दुपारी तीनच्या सुमारास सुद्धा असाच अपघात झाला आहे. दोन्ही अपघातातील चारही गंभीर जखमींवर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज रात्री साडेआठच्या दरम्यान व्हिटीसी फाट्यावर दोन मोटार सायकलींची समोरासमोर टक्कर झाली. यामध्ये सोमनाथ बाळू ठाकरे वय 25 रा. वैतरणा, रामचंद्र अहिलाजी बेंडकुळी वय 30 रा. आशकिरणवाडी हे दोघे युवक गंभीर जखमी झालेले आहेत. अपघाताची माहिती समजताच नरेन्द्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी तातडीने जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तत्परतेने जखमींचे प्राण वाचले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!