इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
इगतपुरी तालुक्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण बऱ्यापैकी वाढतांना दिसत आहे. कोरोनामुक्तीचे प्रमाणही वाढत असल्याने तालुक्याला दिलासा मिळतांना दिसत आहे. आज तालुक्यात 29 जणांनी आज एकाच दिवशी कोरोनावर मात केली असून कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार 29 नव्या संशयित रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज दिवस अखेर ३२३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी ‘इगतपुरीनामा’शी बोलतांना दिली आहे.
कोविड 19 मदत कक्ष मदत ग्रुपचे संस्थापक हरिश्चंद्र चव्हाण यांच्या साहाय्याने प्लाझ्मा दान उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज अनेक सहकाऱ्यांनी प्लाझ्मा दान केले. यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी मोलाची मदत होणार आहे. लोकांमध्ये प्लाझ्मा दान देण्यासाठी जागृती करण्यासाठी ग्रुपकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
कोरोना व्हायरसचा ( Covid-19 ) संसर्ग झाला आहे की नाही ? हे तपासून पाहण्यासाठी रक्त चाचणी करण्याची आवश्यकता नाही. कोरोना लक्षणग्रस्त व्यक्तीचे घशातील स्त्रावाचे नमुने आणि नाकातील स्त्रावाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले जातात. यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्या शारीरिक आरोग्याचीही तपासणी केली जाते. यावरून संशयित रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे की नाही ? हे ठरवलं जातं. अन्यथा, रुग्णाला घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रकृती पूर्णतः सुधारेपर्यंत रुग्णाला पुढील १४ दिवसांसाठी विलगीकरणात राहणं आवश्यक आहे. ह्या आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.