कोरोना काळात लहान मुलांचे मानसिक आरोग्य कसे जपावे ?

मार्गदर्शक : डॉ. कल्पना श्रीधर नागरे
संपर्क क्र. 9011720400
चिकित्सा आणि बाल मानसशास्त्रज्ञ
( एम. ए. बी. एड, एम. फील. सेट, पीएचडी )

लेख वाचल्यावर ज्यांना शंका विचारायच्या आहेत अथवा ज्यांना आपल्या मुलांच्या समस्या आणि प्रश्न आहेत अशा पालकांनी व्यक्तिगत संपर्क साधल्यास त्यांना परिणामकारक मार्गदर्शन करण्यात येईल. आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी डॉ. कल्पना नागरे यांच्या 9011720400 ह्या क्रमांकावर अवश्य संपर्क साधावा.

“बाल्यावस्था” : विकासाचा महत्त्वाचा कालखंड

“बाल्यावस्था” हा काळ शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक व्यक्ती विकासाचा महत्वाचा कालखंड मानला जातो. या काळात शाळा, शिक्षक आणि शाळेतले सवंगडी ही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. शाळांमध्ये मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाला पोषक वातावरण असते. यादृष्टीने मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात शाळेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षरापासून शाळा बंद असल्याने मोठा व्यक्तींसोबत लहान मुलांनाही घरातच राहावे लागत आहे. शाळा बंद असल्यामुळे शिक्षणाला पर्यायी व्यवस्था म्हणून “ऑनलाइन शिक्षण प्रणाली” संकल्पना समोर आली. पालक आणि मुले यांनीही या संकल्पनेचे कोरोनाला पर्याय म्हणून स्वागत केले. परंतु काही दिवसातच तिच्या मर्यादा लक्षात आल्याने पालक आणि मुले दोघांनाही अडचणीची आणि किचकट वाटत लागली आहे, वाटत आहे. विशेषत: लहान मुलांना ऑनलाइन शिक्षणाबद्दल उत्साह वाटत नाही. कारण कोणतेही प्रात्यक्षिक न दाखवता दिलेले लेक्चर मुलांना प्रेरणा, उत्साह देत नाही.

प्रदीर्घ काळापासून पडणारे लॉकडाऊन आणि ऑनलाइन लेक्चर यामुळे सतत घरात राहून लहान मुले वैतागलेली आहे. लॉकडाऊन मुळे मोठ्या व्यक्तीप्रमाणे लहान मुलांचे ही रूटीन बदलले आहे. याचा प्रभाव त्यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर पडत आहे. लहान मुलांच्या मेंदूवरही त्याचा परिणाम होत आहे. जर लॉकडाऊनचा काळ अजून वाढत राहिला तर लहान मुलामुलींना अनेक गंभीर मानसिक समस्यांचा सामना करावा लागेल. अमेरिकेने तर लहान मुले आणि त्यांचे पालक यांच्यासाठी गाईडलाईन सुरू केली आहे. आपल्याकडे देखील अशी गाईड लाईन सुरू करणे गरजेचे आहे.

का वाढतोय मुलांमधील मानसिक तणाव ?

१. साधारण हा काळ शारीरिक, बौद्धिक विकासाचा काळ आहे. शाळा हे माध्यम मुलांचे शारीरिक बौद्धिक विकासाचे प्रभावी माध्यम आहे. शाळा बंद असल्याने मुलांना आउट डोअर खेळ खेळता येत नाही. आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटता येत नाही. त्यामुळे लहान मुले वैतागलेली आहेत.

. लॉकडाऊनमुळे आई वडील पूर्ण वेळ घरातच राहतात. त्यामुळे बऱ्याच घरात कौटुंबिक कलह निर्माण झाले आहे. आई-वडिलांच्या वाढत्या भांडणामुळे मुलांमधील तणाव वाढत आहे. अशा मुलांमध्ये एकटेपणाची, असुरक्षिततेची, भितीची भावना घर करून जाते. जी मुले आधी पासूनच तणावात आहेत त्यांना याचा अधिकच त्रास होतोय.

. कोणतेही प्रात्यक्षिक न दाखवता ऑनलाइन तासिका होत असल्याने मुलांना ऑनलाइन शिक्षण उत्साहवर्धक वाटत नाही. विशेषत: लहान मुलांना कंटाळवाणे वाटत आहे. तसेच तासनतास मोबाईल अथवा लॅपटॉप स्क्रीन समोर बसून विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास निर्माण व्ह्यायला लागतात. डोकेदुखी, डोळ्यात आग होणे व थकवा येणे यासारख्या शारीरिक समस्या तर चिडचिडेपणा या सारख्या मानसिक समस्या निर्माण होत आहे.

कसे राखाल मुलांचे मानसिक आरोग्य ? पालकांसाठी सूचना

मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य संवर्धन करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. यादृष्टीने पालकांनी आपल्या पाल्यांसाठी काही गोष्टींची काळजी घेतल्यास केल्यास लहान मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य जोपासले जाईल.

. शाळा बंद आहेत आणि लॉक डाऊन मुळे मुले बाहेर जाऊ शकत नाही. अशा वेळी पालकांनी त्यांच्यासोबत खेळ खेळा, घरातील काही गोष्टीत मुलांना सहभागी करून घ्या.

. मुलांना योगासने व व्यायामाची सवय लावा. जेणेकरून मुलांचा शारीरिक ताण कमी होईल.

. लहान मुले सतत घरात राहून कंटाळतात. अशावेळी पालकांनी मुलांची कुवत ओळखून घरातले छोटे-मोठे जबाबदारीची कामे सांगावी. उदा. घरातील वस्तू जागेवर उचलून ठेवणे, आपल्या शालेय वस्तू व्यवस्थित ठेवणे, साफसफाई करणे, झाडांना पाणी देणे, भाज्या फळे स्वच्छ करणे इत्यादी यामुळे मुलांचा वेळ ही मजेत जाईल आणि स्वतःची कामे स्वतः करायची सवय देखील लागेल.

. लहान मुले ही संवेदनशील असतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या समोर वाद-विवाद कटाक्षाने टाळावे. तसेच लहान मुले ही अनुकरणशील असतात. यामुळे धूम्रपान, मद्यपान , अपशब्द बोलणे इत्यादी गोष्टी पालकांनी कटाक्षाने टाळाव्या.

. लहान मुले खूप चौकस वृत्तीची असतात. ती सतत पालकाना  प्रश्न विचारत असतात. अशावेळी न चिडता, न थकता पालकांनी प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा. आपली मुले सतत मोबाईल वर गेम खेळत तर नाही ना ? याकडे लक्ष द्यावे. ऑनलाईन क्लासेस सुरू असताना पालकांनी मुलांकडे अधून मधून लक्ष देणे द्यावे. जेणेकरून आपली मुले मोबाईलचा योग्य वापर करत आहे की नाही, यावर लक्ष देता येईल.तसेच दिवसातील ठराविक काळातच मुलांना मोबाईल लॅपटॉप इत्यादी हाताळू द्यावे.

. पालकांनी दिवसातला ठराविक वेळ मुलांसाठी राखून ठेवावा. या काळात मॉरल गोष्टी सांगणे, रंगकाम, चित्रकला शाडूच्या मूर्ती बनवणे यासारख्या विविध ऍक्टिव्हिटी मुलांकडून करून घेता येईल. 

. सध्याचा काळ बघता पालकांनाच शिक्षकांच्या भूमिकेत आले पाहिजे. विषय मुलांना समजत नसेल तो  विषय स्वतः समजून सांगा.शक्य असेल तर प्रात्यक्षिक दाखवून विषय समजून सांगावा. जेणेकरून त्यांना विषय व्यवस्थित समजेल आणि अभ्यासाची देखील गोडी निर्माण होईल.उदाहरणार्थ झाडे, फुले यांची नावे इत्यादी. बागकाम, विविध मिश्रणे आदी.

सध्याचा काळ कठीण आहे हे वास्तव सत्यच आहे. ते नाकारता येणार नाही,परंतु शाळा आणि शिक्षक यांच्यावर अवलंबून न राहता स्वतःच आपल्या मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्या. शेवटी आपली मुलं आपली जबाबदारी !

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/CPlWhNtEmaY

( लेखिका डॉ. कल्पना श्रीधर नागरे ह्या चिकित्सा आणि बाल मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांची सेट नेट मानसशास्त्र, मनोविकृती मानसशास्त्र, उपयोजित मानसशास्त्र, वैकासिक मानसशास्त्र आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. )

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!