कवी : जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१
अवेळी आम्हां मरण आले तर,
सोबत नेणार आहे तरी काय ?
भुकेल्यास तुम्ही अन्न दिले तर,
पुण्य तुम्हास मिळणार हाय !
मानव धर्म जपायचा हाय तर,
निसर्ग ऱ्हास करायचा नाय !!
रक्ताची माणसंच मेली तर,
पुनश्च तुम्हां मिळतील काय ?
घर दुर्घटनेनं जळालेच तर,
नवीन बांधता येणार हाय !
मानव धर्म जपायचा हाय तर,
निसर्ग ऱ्हास करायचा नाय !!
शिक्षणाचे बाळकडू नसेल तर,
माणसास किंमत आहे काय ?
बालकांना शिक्षण दिलं तर,
देशाचं भविष्य घडणार हाय !
मानव धर्म जपायचा हाय तर,
निसर्ग ऱ्हास करायचा नाय !!
मुलीला नकोशी म्हणाल तर,
जन्मच तुम्हांस मिळेल काय ?
आई बापाचं प्रेम मिळालं तर,
लेकीचं महत्व कळणार हाय !
मानव धर्म जपायचा हाय तर,
निसर्ग ऱ्हास करायचा नाय !!
निसर्गाचा ऱ्हासचं केला तर,
भावी पिढी माफ करेल काय ?
वृक्ष संवर्धन तुम्हीचं केले तर,
प्राणवायू तुम्हा मिळणार हाय !
मानव धर्म जपायचा हाय तर,
निसर्ग ऱ्हास करायचा नाय !!
पाणी अति उपसा केलाच तर,
पिण्याचे पाणी मिळेल काय ?
जलसंवर्धन तुम्हीचं केले तर,
पाणी तुम्हा मिळणार हाय !
मानव धर्म जपायचा हाय तर,
निसर्ग ऱ्हास करायचा नाय !!
स्वतःची निगा राखली नाही तर,
मानवचं शिल्लक राहिल काय ?
कोरोना विषाणू साथ गेली तर,
जिवंत माणुस दिसणार हाय !
मानव धर्म जपायचा हाय तर,
निसर्ग ऱ्हास करायचा नाय !!
पैशा मागे धावत राहाल तर,
आयुष्याची साथ मिळेल काय ?
मानव जातीवर प्रेम केले तर,
आयुष्य अतिसुंदर होणार हाय !
मानव धर्म जपायचा हाय तर,
निसर्ग ऱ्हास करायचा नाय !!
आश्वासनाने सत्ता आलीच तर,
सत्यात तुम्ही आणणार काय ?
दिलेला शब्द पाळला नाही तर,
जनता तुम्हा बाद करणार हाय !
मानव धर्म जपायचा हाय तर,
निसर्ग ऱ्हास करायचा नाय !!
स्वार्थासाठी जीवन जगला तर,
काळ तुम्हा माफ करेल काय ?
हसत खेळत जीवन जगला तर,
आयुष्य तुमचेच वाढणार हाय !
मानव धर्म जपायचा हाय तर,
निसर्ग ऱ्हास करायचा नाय !!
( कवी जी. पी. खैरनार हे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक आहेत. )