![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/06/IMG-20210607-WA0011.jpg)
इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्ताने शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्था नाशिक या संस्थेने विविध उपक्रम राबवले. यानिमित्ताने सहा जूनला रायगड जिल्ह्यातील सरसगड, प्रबळगड आणि कलावंतीन गड या किल्ल्यांवर अनुक्रमे तीस-एकतीस आणि बत्तिसावी दुर्गसंवर्धन मोहीम राबवून अनोख्या पद्धतीने शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच स्वराज्य दिन साजरा केला. पाली येथील किल्ले सरसगडावर स्थानिक संस्थेमार्फत वृक्षारोपन चालू होते. त्यांच्या या कार्यात शिवदुर्ग संवर्धन संस्थेनेही सहभाग नोंदवला. या मोहिमेमध्ये गणेश कातोरे, किसन थोरात, विजय महाले, राम दाते, पुरुषोत्तम रहाडे, ज्ञानेश्वर धोंगडे, सोमनाथ गव्हाणे, शाम गव्हाणे आदी शिवभक्त सहभागी झाले होते.