त्रिंगलवाडी किल्ल्यावर रंगला “शिवराज्याभिषेक” सोहळा ; घोटीच्या कळसुबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांचा सहभाग

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
घोटीच्या कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध त्रिंगलवाडी किल्ल्यावर सालाबादप्रमाणे  शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. शासनाचे सर्व अटी नियम पाळून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी शिवप्रेमी अभियंता मयूर मराडे यांनी शिवाजी महाराजांचा वेश परिधान केला. इतर शिवप्रेमीनी मावळ्यांचा वेश परिधान करून त्यांची किल्ल्यावर जोरदार मिरवणूक काढली. उपस्थितांकडून छत्रपती व मावळ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा पंचामृताने अभिषेक करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

यावेळी प्रसिद्ध शिवचरित्रकार प्राध्यापक जावेद शेख यांनी त्रिंगलवाडी किल्ल्याचा इतिहास व माहिती दिली. शिवराज्याभिषेक दिनाच्या इतिहासाची माहिती देऊन साक्षात शिवमय वातावरण निर्माण केले. यावेळी किल्ल्यावर मावळ्यांनी पारंपारिक तलवारबाजी, दांडपट्टा इतर खेळांचे आयोजन केले होते. कळसूबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित केला होता.

या भव्य दिव्य शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक बाळू आरोटे, अशोक हेमके, प्रवीण भटाटे, अभिजित कुलकर्णी, रामदास आडोळे, निलेश पवार, निलेश बोराडे, काळू भोर, डॉ. महेंद्र आडोळे, नितीन भागवत, उमेश दिवाकर, ज्ञानेश्वर मांडे, गोकुळ चव्हाण, बबलू बोराडे, सोमनाथ भगत, भाऊसाहेब जोशी, जैनम गांधी, दिप्तेश कुमठ, जनार्दन दुभाषे, रमेश हेमके, धनंजय बोराडे, संतोष म्हसणे, साक्षी आरोटे, जान्हवी भोर, पुष्कर पवार, यज्ञेश भटाटे, कृष्णा बोराडे, स्वप्नील बेलेकर महिला भगिनी, बालगिर्यारोहक सहभागी झाले होते.