इगतपुरीनामा न्यूज, दि. 29
मुंबई आग्रा महामार्ग म्हणजे जनावरे, भटके कुत्रे आणि खड्डे यामुळे अत्यंत असुरक्षित बनला आहे. यावर प्रशासन उपाययोजना करीत नसल्याने रोजच अपघात होत आहेत. आज सकाळी गोंदे दुमाला कडून घोटीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलला अचानक बैल आडवा आल्याने अपघात झाला. ही घटना मुंढेगावच्या जवळ घडली. अचानक आलेल्या बैलावर मोटारसायकल गेल्याने झालेल्या अपघातात 13 वर्षीय शाळकरी मुलगा गंभीर जखमी तर 1 युवक किरकोळ जखमी झाला. या घटनेची माहिती जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेला मिळाली. त्यानुसार रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तात्काळ सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले. MH 15 EK 4678 ह्या मोटारसायकलवरील शाळकरी मुलगा कृष्णा विलास शिंदे वय 13, मोटारसायकल चालक भारत भानुदास शिंदे वय 27 दोघेही राहणार वंजारवाडी, ता. जि. नाशिक अशी जखमींची नावे आहेत.