इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
इगतपुरी तालुक्याची वाटचाल हळूहळू का होईना कोरोनामुक्तीकडे होत आहे. आज तब्बल 45 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला. कोरोनामुक्त झालेल्या 45 व्यक्तींना घरी सोडण्यात आले. सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार फक्त 38 व्यक्तींचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आज अखेर एकंदरीत 337 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. आरोग्य विभागाकडून कोरोना निर्मूलनाचे काम जोरात सुरू असून नागरिकांनी साहाय्य करण्याची अपेक्षा आहे.
इगतपुरी तालुक्यात ठिकठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करून घेतले. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमासाठी शासनाने अधिकाधिक लस उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
■ सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! संपर्क – 7030288008